Showing posts with label खरा तो एकची धर्म. Show all posts
Showing posts with label खरा तो एकची धर्म. Show all posts

Sunday, December 1, 2013

खरा तो एकची धर्म (Khara to Eakachi Dharma)



खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे || धृ ||

जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पददलित
तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ||१||

सदा जे आर्त अतिविकल,
जयांना गांजती सकल,
तया जाऊनी हसवावे, जगाला प्रेम अर्पावे ||२||

कुणा ना व्यर्थ हिणवावे,
कुणा ना व्यर्थ शिणवावे
समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे ||३||

प्रभुची लेकरे सारी ,
तयाला सर्वही प्यारी,
कुणा ना तुच्छ लेखावे , जगाला प्रेम अर्पावे ||४||

असे हे सार धर्माचे,
असे हे सार सत्याचे,
परार्था प्राण ही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे ||५||